अशोक लेलॅंडमध्येही उत्पादन थांबविले

वाहन उद्योगावर मंदीचे काळे ढग

चेन्नई : हिंदुजा ग्रुपच्या वाहन उद्योगातील अग्रगण्य असणाऱ्या अशोक लेलॅंड कंपनीने सोमवारी काम बंद दिवस जाहीर केले. आपल्या वाहनांच्या मागणीत घट झाल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या परिपत्रकात म्हटले आहे. यामुळे वाहन उद्योगातील मंदी अधोरेखीत झाली आहे.

तामिळनाडूतील इन्नोरमध्ये 16 दिवस, होसूरमध्ये पाच दिवस, अल्वार (राजस्थान) आणि भंडारा (महाराष्ट्र) येथे 10 दिवस तर उत्तराखंडमधील पंतनगरचा प्लांटमध्ये 18 दिवस उत्पादन बंद ठेवण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात सुंदरम क्लेटॉन, मारूती सुझुकी, हिरो कॉप या कंपन्यांनी उत्पादनात कपात केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.