तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील जैन इंग्लिश स्कूलमध्ये रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील सर्व शाळांसाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा, शालेय चेअरमन प्रकाश ओसवाल, संचालक सदस्य किरण परळीकर, दिलीप पारेख, दिलीप वाडेकर, राकेश ओसवाल, मुख्याध्यापिका अपूर्वा टकले, शुभांगी भोईर आदी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी विज्ञानाची ओळख सांगताना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ दीपक शहा यांनी येणारा भविष्यकाळ फक्त विज्ञानाचाच असेल. तसेच आपल्या बुद्धिमत्तेला चालना देऊन चौकस बुद्धी जिज्ञासू वृत्ती वाढवावी. यासाठी आजच्या पिढीने जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.
परिक्षण पिंपरी चिंचवड येथील अमोल सलागरे आणि रविराज कुमार यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश ओसवाल यांनी केले. शाळेची विद्यार्थिनी प्राप्ती हडवळे हिने मनोगत व्यक्त केले. नियोजन मुख्याध्यापिका विजया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षिका तृप्ती अगरवाल, वृषाली भोंडेकर, अमृता सेलुकर यांनी केले. सूत्रसंचालन कविता फाकटकर यांनी केले