नवी दिल्ली – करोनासारख्या घातक रोगावर उपचार म्हणून लाल मुंग्याची चटणी उपयुक्त असल्याचा दावा ओडिसातील एका समूहाने केला असून हे औषध देशभर वापरण्याची परवानगी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली होती पण सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारची परवानगी नाकारली आहे.
पारंपरिक प्रकारातील देशी औषधे वैयक्तिक पातळीवर वापरणे योग्य ठरेल या औषधांचा वापर देशव्यापी पातळीवर करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निकालपत्रात म्हटले आहे ओडिसातील आदिवासी समाजातील कार्यकर्ते नयधर पाधियाल यांनी याबाबत याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर निकाल देताना न्यायमूर्ती चंद्रचूड विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती हेमा कोहली यांनी अशा प्रकारच्या पारंपारिक औषधाचा वापर देशव्यापी पातळीवर करण्याची परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट केले आहे याचिका कर्ता आणि त्यांचा समूह वैयक्तिक पातळीवर वाटल्यास या औषधाचा वापर करू शकतो औषधाचा वापर देशव्यापी पातळीवर व्हावा अशी मागणी ते करू शकत नाहीत असे या न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
याचिकाकर्त्यांनी करोना लस घेण्यासही प्राधान्य द्यावे असा सल्ला ही न्यायमूर्तींनी दिला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ओडिशा उच्च न्यायालयाने या चटणीचा वापर कोरोनावरील उपचारासाठी करण्याबाबत संशोधन करण्याबाबत आयुष मंत्रालय याला तीन महिन्यात निर्णय घेण्याचा आदेश दिला होता त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली .
असता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि अशा चटणीचा औषध म्हणून वापर करण्याची परवानगी देशव्यापी पातळीवर देता येऊ शकत नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले लाल मुंग्यांची चटणी आणि त्यामध्ये हिरवी मिरची मिसळून औषध तयार होते त्याचा वापर ओडीसा आणि छत्तीसगडमधील आदिवासी समाज गेले.
कित्येक वर्ष खोकला,ताप आणि दमा या आजारांसाठी करत असल्याचा दावा याबाबतच्या याचिकेत करण्यात आला होता याचिकेमध्ये या औषधाचे महत्त्व सांगून त्यामध्ये कोणते औषधी घटक आहेत त्याची माहितीही दिली होती पण सर्वोच्च न्यायालयाने ते सर्व नाकारून याचिका फेटाळून लावली.