उदयपूर – डीएसपीचे स्विमिंग पूलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील चाळे करत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका रिसॉर्ट मध्ये डीएसपी व महिला कॉन्स्टेबल स्विमिंग पूलमध्ये अश्लील चाळे करत असताना पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकला असून डीएसपीसा अटक केली आहे. हा प्रकार राजस्थानच्या उदयपूरशहरात घडला आहे.
डीएसपी व महिला कॉन्स्टेबलचा अश्लील चाळे करत असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील रिसॉर्टची माहिती घेत पोलिसांनी संबंधित रिसॉर्टवर छापा टाकला व थेट डीएसपीलाच अटक केली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हीरालाल असे डीएसपीेचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला कॉन्स्टेबलसोबत लहान मुलगा असल्यामुळे तिला अटक करण्यात आली नाही. अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलचा पती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता. पण डीएसपीच्या दबावामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला गेल्याचा आरोप पतीनं केला आहे.
दरम्यान, तक्रार दाखल न केल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही निलंबीत करण्यात आले आहे. तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डीसीपींवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.