जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहिद

जम्मू : जम्मू-काश्‍मीरमधील शोपिंयामध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात मोठी चकमक सुरू आहे. दरम्यान, या चकमकीत एक भारतीय जवान शहिद झाल्याची माहिती समोर येत आहे. सैन्याच्या 34 आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेराव घातला असून शोधमोहिम सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपासून दहतवादी आणि सैन्यात चकमक होत आहे. सलग दुसऱ्यादिवशी सैन्याने दहशतवाद्यांना निशाणा बनवला आहे. यात जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले होते. दरम्यान, आणखी एका घटनेत दहशतवाद्यांनी सैन्याच्या गाडीला निशाणा बनवला असून स्फोटाव्दारे गाडी उडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. परंतु, त्यात दहशतवादी अपयशी ठरले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.