वाघोली- पुणे नगर स्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणारा रस्ता होणार आहे. वाघोली तालुका हवेली येथील बी.आर.टी बस स्थानकाच्या मागील बाजूस असणारा केसनंद रोड ते आव्हाळवाडीला जोडणारा अंतर्गत रस्ता केला जाणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व पुणे महानगर पालिकेचे आयुक्त यांच्याकडे १ जानेवारी २०२३ पासून पाठपुरावा केला. या रस्त्यासाठी जवळपास ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी दिली आहे.
यावेळी संदीप सातव यांनी सांगितले की, आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पुढील आर्थिक विकास आराखडा मध्ये ह्या रस्त्यासाठी निधी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार सन मे 2023 महिन्यात या महानगर पालिकेचे अधिकारी यांच्या सोबत रस्त्याची पाहणी करून अंदाज पत्रक तयार करण्यात आले. 18 जुलै 2033 रोजी ऑनलाईन निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी 5,95,0099 रू ही रक्कम निश्चित करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे संदीप सातव यांनी सांगितले.
बी.आर.टी बस स्थानकाच्या मागील बाजूस असणारा केसनंद रोड ते आव्हाळवाडी रस्त्याला जोडणारा अंतर्गत रस्ता आव्हाळवाडी, मांजरी, केसनंद, वाडे बोल्हाई गावाकडे ये-जा करण्यासाठी जवळचा आहे. तसेच पुणे-नगर स्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करणारा हा जवळचा मार्ग ठरणार आहे. दरम्यान, संदीप सातव यांनी तत्कालीन पालकमंत्री, पुणे मनपा प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करून ६० लक्ष रुपये निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांकडून सातव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“केसनंद फाटा वरील BRT मागच्या बाजूस काळूबाईनगर मधील नागरिकांना जाण्यासाठी रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. यामुळे नागरिकांना महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्ता करण्यासाठी पुणे महानगर पालिकाकडे पाठपुरावा करून ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करून टेंडर प्रक्रिया करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.” – संदीप सातव जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा