PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंदिरात बालाजीची विधीवत पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी संध्याकाळी तिरुपती बालाजी मंदिराजवळ असलेल्या रेनिगुंटा विमानतळावर उतरले. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर (S. Abdul Nazir) आणि मुख्यमंत्री वाय.एस.आर जगन मोहन रेड्डी (YSR Jagan Mohan Reddy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केले. तिरूपती बालाजी दर्शनादरम्यानचे काही फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटर (एक्स) अकाऊंटवर शेअर केले आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले की, ‘तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात १४० कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी शुभेच्छा.’ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुमलामध्ये व्यंकटेश्वर मंदिरात पारंपारिक वेशभुषेत पाहायला मिळाले. सकाळी झालेल्या पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी १२.४५ च्या दरम्यान महबुबाबाद या ठिकाणी जाणार आहेत. त्यानंतर तेलंगणच्या करीम नगर या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे.त्यानंतर संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे.
At the Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala, prayed for the good health, well-being and prosperity of 140 crore Indians. pic.twitter.com/lk68adpgwD
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2023
पंतप्रधान मोदींचा रोड शो दुपारी ४ वाजता सुरू होईल आणि आरटीसी क्रॉसरोडपासून सुरू होईल आणि काचेगुडा क्रॉसरोडपर्यंत जाईल. याआधी मोदी दुपारी १२ वाजता महबूबाबाद आणि दुपारी 2 वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. दरम्यान येत्या ३० नोव्हेंबरला तेलंगणामध्ये मतदान होणार आहे. त्यावेळी प्रचारादरम्यान रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर कडक शब्दात टीका केली.