पुणे – धावत्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी कोथरूड भागात घडली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. कोथरूड परिसरातील कर्वे पुतळ्यापासून काही अंतरावर असलेल्या कोकण एक्स्प्रेस हॉटेलजवळ सकाळी अकराच्या सुमारास धावत्या रिक्षाने पेट घेतला.
पुण्यात धावत्या रिक्षाला आग pic.twitter.com/NooyFpCZIQ
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 17, 2021
या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. रिक्षात प्रवासी नव्हते. प्रसंगावधान राखून रिक्षाचालक खाली उतरल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या कोथरूड केंद्रातील जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.