बुलडाणा – बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना या गावातील जवान गणेश हरी राठोड (वय 42) आसाम मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना, देशाचे रक्षण करीत असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते सीआरपीएफ बटालियन 67 बी.एन.मध्ये कार्यरत होते.
वयाच्या 18 वर्षांपासूनच ते सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबामध्ये एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रसह बुलढाणा तसेच मेहकर तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे.
राठोड यांना लहानपणापासून देशसेवा करण्याची आवड असल्याने ते सीआरपीएफ मध्ये भरती झाले होते. त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर व मित्रमंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.