हैदराबाद- तेलंगणा सरकराने राज्यातील सर्वच गरीब दलित कुटुंबांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण योजनेअंतर्गत तेलंगणा राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबाला दहा लाख रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सरकारने दलितांसंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यासाठी निधीचीही तरतूद सरकारने केली आहे.
तेलंगणा सरकारने दलित सशक्तीकरण योजनेअंतर्गत पुढील चार वर्षांत चाळीस हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे. हा निर्णय रविवारी दलित सक्षमीकरणासंदर्भात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दलितांना करण्यात येणाऱ्या मदतीच्या पहिल्या टप्प्यासाठी बाराशे कोटी रुपयांची घोषणा तेलंगणा सरकारने केली आहे.
चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे की या वर्षी या योजनेअंतर्गत सर्व 199 विधानसभा मतदारसंघातून 100-100 कुटुंबांची निवड करण्यात येईल. योजनेअंतर्गत यावर्षी 1,200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री राव यांनी पुढे सांगितले की राज्यातील एकूण 11,900 दलित कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही रक्कम या लाभार्थींच्या बॅंक खात्यात थेट जमा केली जाणार आहे.