मुझफ्फरनगर – औषधांचा एक बेकायदेशीर कारखाना आज उत्तर प्रदेशातील एका गावामध्ये उघड करण्यात आला आणि या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे औषध विभागाने बिलासपूर गावामध्ये छापा घातला. या ठिकाणी औषधांसाठीचा कच्चा माल आणि लाखो रुपये किमतीची यंत्रसामग्री आढळून आली.
हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून, न्यू मंडी पोलीस स्थानकामध्ये याबाबत प्रकरण दाखल करण्यात आले आहे. औषध निरीक्षक लवकुश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान या कारखान्यात तयार होणारी औषधे मीरत, कानपूर, बाघपत, लखनौ, गाझियाबाद, सहारणपूर आणि आग्रा येथे पुरवली जात होती.