ब्युनोस आयर्स -पोर्तुगालचा जागतिक स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एका फोटोला मागे टाकत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिअनेल मेस्सीच्या एका फोटोने जगातील सगळे विक्रम तोडले आहेत. या फोटोने तब्बल 20 मिलियन लाईक्स मिळवले आहेत. हा फोटो क्रीडा विभागात सर्वाधिक लाईक्स मिळालेला फोटो ठरला आहे.
अर्जेंटिनाचा कर्णधार असलेल्या मेस्सीने नुकतीच मानाची स्पर्धा कोपा अमेरिका स्पर्धा आपल्या देशाला जिंकून दिली. ब्राझीलचा पराभव करत या विजयासह मेस्सीने अनेक वर्षानंतर देशाला एक मोठी स्पर्धा जिंकून दिली.
कोपा अमेरिका स्पर्धेच्या करंडकासह मेस्सीने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला त्याला 20 मिलियन लाईक्स मिळाले आहेत.
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्सचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर होता तो मेस्सीने मागे टाकला. महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहताना रोनाल्डोने पोस्ट केलेल्या फोटोला 19.8 मिलियन लाइक्स मिळाले होते.