वॉशिंग्टन- तालिबानचा अंमल असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये अल कायदा ही दहशतवादी संघटना पुंन्हा एकत्र येत असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत, असे अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संघटना सी आय ए ने म्हटले आहे.
सीआयए चे उपसंचालक डेव्हिड कोहेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त हेरांनी दिलेल्या अहवालानुसार आलं कायदाच्या काही संभाव्य हालचाली दिसत आहेत. मात्र त्याचवेळी सीआयए याकडे समांतर पद्धतीने तपास करत आहे.
कोहेन म्हणाले, अमेरिकन गुप्तचर संस्था याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वॉशिंग्टन येथे झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत कोहेन बुधवारी बोलत होते. ते म्हणाले, कबुलमधील अमेरिकेचा दूतावास बंद केल्याने आणि सीआयए चे जाळे नष्ट केल्याने वस्तुस्थिती दर्शक अहवाल मिळवण्यात अडचणी येत आहेत.
गुप्तचरानी गेल्या काही आठवड्यात समांतर व्यासपीठावरून माहिती संकलित केली आहे म्हणजे अफगाणिस्तान लागतच्या देशातून माहिती गोळा केली आहे.
अमेरिकन गुप्तचारांच्या अंदाजानुसार अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा पोहोचावे यासाठी पूर्वी इतकी हल्ल्याची क्षमता मिळवण्यासाठी आलं कायदाला आणखी एक दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे वृत्त इंटेलन्यूज या प्रतिष्टीत संकेतस्थळाने दिले आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानात हस्तक्षेप करण्यापूर्वी म्हणजे 2001 पूर्वी तेथे अल कायदाचा प्रभाव होता. तो नाहीसा करण्यात आला होता. मात्र तालिबानने सत्ता हस्तगत केल्याने तेथे अल कायदा पुन्हा शिरकाव करू शकते.