मुंबई- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटूंबामध्ये नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याची पत्नी श्लोका अंबानी हिने बुधवार (31 मे) एका गोड मुलीला जन्म दिला आहे. मुकेश अंबानी आता दुसऱ्यांदा आजोबा झाले आहेत.
या प्रसांगामुळे अंबानी कुटुंबामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 2020 साली श्लोका अंबानी हिने पहिल्या मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव ‘पृथ्वी’ असे आहे. त्यामुळे आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.
अशी आहे आकाश आणि श्लोकाची लव्हस्टोरी…
आकाश आणि श्लोका हे शालेय काळापासून एकमेकांना ओळखत होते. दोघेही बालपणीचे मित्र आहेत आणि दोघेही धीरूभाई अंबानी या शाळेत शिकले आहेत.
दोघांनी एकमेकांना खूप दिवस डेट केले होते आणि नंतर लग्न केले. त्यावेळी गोव्यात आकाशने श्लोकाला प्रपोज केल्याची माहिती समोर आली होती. श्लोका ही अंबानी कुटुंबाची मोठी सून आहे.