मंचर-आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने बलात्कार करून लैंगिक छळवणूक केली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. बालसुधार गृहात अल्पवयीन मुलाला दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
जुन्नरफाटा -घोडेगाव येथील अल्पवयीन मुलाने साडे पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलावर घोडेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार करीत आहेत.