Kushal badrike: ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). आपल्या विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर देखील कुशल सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. कामाबाबत तसेच काही वैयक्तिक माहिती तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यानंतर आता नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतरांप्रमाणे कुशलने संकल्प केला आहे. नवीन वर्षात कुशल कोणकोणत्या गोष्टी करणार आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे.
सुरुवातीला कुशल बद्रिकेने 2023 या वर्षात वैयक्तिक आयुष्यात व व्यावसायिक आयुष्यात आलेले अनुभव सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केले आहेत. तसेच यामध्ये अभिनेत्याने नवीन वर्षाच्या संकल्पाविषयी देखील सांगितलं आहे. कुशलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “या सरत्या वर्षाने जाताना बऱ्याच गोष्टी सोबत नेल्या. काही माणसं मनात घरं करुन कायमची निघून गेली, त्या रिकाम्या घरांच्या जागा आता कधीच भरुन काढता येणार नाहीत. दरवर्षीप्रमाणे हे वर्ष सुद्धा, “व्याजाचा हप्ता” जावा तसा माझ्यातला थोडा “innocence” घेऊन गेलंच. मी invest केलेल्या “FD” प्रमाणेच माझ्यातही “maturity” आली नाही, ती नाहीच ! बहुतेक कुठे “invest करावं” आणि कुठे “invest व्हावं” हे मला खरंच कळत नाही.”
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, “मित्रांनी सांगितलंय नवीन वर्षात जाताना कोणत्याच emotions चं baggage सोबत घेऊन जाऊ नकोस, म्हणून माझ्यातल्या मलाच थोडा मागे ठेऊन निघालोय. बाकी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. येत्या वर्षात व्याज थोडं कमी लागू दे , “investment” ला “maturity” येऊ दे,आणि मनातली रिकामी घरं भाडेतत्वावर का होईना, पण जाऊ देत. मनाच्या उंबरठ्यावर पावलांची ये जा रहायला हवी. (सुकून)” कुशलच्या पोस्टनंतर अनेकांनी त्याच्या लिखाणाचे कौतुक केले. तसेच काहींनी त्याला पुस्तक लिहिण्याचा देखील सल्ला दिला.