PM Modi Ayodhya Visit – पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनगरी अयोध्येत आज सकाळी ११ च्या सुमारास दाखल झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचा ताफा काही वेळात पुढे सरकणार असून त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उभे आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्या पहुंचे। उत्तर प्रदेश की राज्यपाल आनंदीबेन पटेल और मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने प्रधानमंत्री का स्वागत किया।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महर्षि वाल्मिकी अंतर्राष्ट्रीय हवाईअड्डा अयोध्या धाम, पुनर्विकसित अयोध्या धाम रेलवे स्टेशन का उद्घाटन… pic.twitter.com/6L6c9k2LiK
— ANI_HindiNews (@AHindinews) December 30, 2023
पीएम मोदींचा रोड शो सुरू झाला आहे. त्यांचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली असून लोक ‘जय राम, श्री राम’च्या घोषणा देत पीएम मोदींचे पुष्पवृष्टी करून स्वागत करत आहेत. यादरम्यान लोक पंतप्रधानांच्या रोड शोचे फोटो काढताना दिसले. यावेळी महिला रस्त्यावर नाचताना दिसत आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives in Ayodhya, Uttar Pradesh
PM Modi will inaugurate the Maharishi Valmiki International Airport Ayodhya Dham, redeveloped Ayodhya Dham Railway Station, and flag off new Amrit Bharat trains and Vande Bharat trains. pic.twitter.com/c60Tzh4Xkb
— ANI (@ANI) December 30, 2023
दरम्यान मोदी सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा प्रकल्पांना भेट देणार आहेत. येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकासह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहे. दोन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी अयोध्येतील चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण आणि सुशोभित रस्त्यांचे उद्घाटन करतील. रामपथ, भक्तिपथ, धरमपथ आणि श्री रामजन्मभूमी पथ. या रस्त्यांचा समावेश आहे.
याच दरम्यान, अयोध्येत रोड शो आणि जाहीर सभेलाही मोदी संबोधित करणार आहेत. यावेली अयोध्येत देशभरातील कलाकारांचे विविध गट त्यांचे स्वागत करणार आहे. विमानतळ ते रेल्वे स्टेशन, राम पथ मार्ग असे एकूण 40 टप्पे तयार करण्यात आले आहेत. 1,400 हून अधिक कलाकार येथे लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.
PM मोदींचा आज अयोध्या दौरा, जाणून घ्या मिनिट-मिनिटाचा कार्यक्रम
-पंतप्रधान सकाळी 11 वाजता विशेष विमानाने अयोध्या विमानतळावर पोहोचतील.
-11.10 वाजता अयोध्या रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
-सकाळी 11.15 वाजता पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील.
-अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
-रात्री 11.50 वाजता अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना होतील.
-अयोध्येचे महर्षी वाल्मिकी दुपारी 12.15 वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनलची पाहणी आणि उद्घाटन करतील.
-दुपारी 1 वाजता ते विमानतळ टर्मिनलजवळील सार्वजनिक सभेच्या ठिकाणी अयोध्येच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि इतर विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.
-सुमारे तासाभराच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी दुपारी 2 वाजता जाहीर सभेच्या ठिकाणाहून विमानतळाकडे रवाना होतील.
-दुपारी 2.10 वाजता अयोध्या विमानतळ हेलिपॅडवर पोहोचेल. दुपारी 2.15 वाजता पंतप्रधान दिल्लीला परततील.