मुंबई – बॉलीवूड अभिनेता ‘अक्षय कुमार’ हा फिल्म इंडस्ट्रीतील एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता आहे. हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक कमाईच्या यादीवरून दिसून येते. या यादीत स्थान मिळविलेला अक्षय हा एकमेव भारतीय अभिनेता आहे. तथापि, करोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनने सध्या त्याच्या चित्रपटांचे प्रदर्शन आणि शूटिंग बंद आहे.
अक्षयचा आगामी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण करोना विषाणूमुळे सिनेमागृह बंद असल्याने त्याचे प्रदर्शन रखडले आहे. त्याचप्रमाणे अक्षयच्या आगामी ‘बेल बॉटम’ चित्रपटाचे शूटिंगही लॉकडाऊनमुळे थांबले आहे. ‘बेल बॉटम’ हा चित्रपट 80च्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित असून, दिग्दर्शक रणजित तिवारी यांचा हा बीग बजेट चित्रपट आहे.
Looking forward to doing what we do best! Time we get back to work! #Bellbottom to go on floors next month @vashubhagnani @vaaniofficial @humasqureshi @LaraDutta @ranjit_tiwari @jackkybhagnani @honeybhagnani @monishaadvani @madhubhojwani @nikkhiladvani @EmmayEntertain @poojafilms pic.twitter.com/QmqTLFtnG3
— Akshay Kumar (@akshaykumar) July 6, 2020
दरम्यान, नुकतंच आज (दि. 6) अक्षय ने सोशल मिडियावर बेल बॉटम चित्रपटातील स्टारकास्टसह फोटो एक शेअर केला आहे. या फोटोत लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरैशी, प्रोड्यूसर जैकी भगनानी आणि दिग्दर्शक रंजित तिवारी दिसत आहेत. पुढील महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट 2 एप्रिल 2020 ला प्रदर्शित करण्याची शक्यता आहे.