लॉकडाऊनमध्ये शबाना आझमीकडून मदतीचा हात

करोना विषाणूने संपूर्ण जग प्रभावीत झाले असून त्याला रोखण्यसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.याच काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पुढाकार घेत गरजुंना मदतीचा हात दिला आहे. तसेच करोनाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठीही अनेक उपक्रम राबविले जात आहे. आता शबाना आझमी यांनीही 10 लाखांहून अधिक गरजूंना रेशन आणि आवश्‍यक वस्तूंची मदत केली आहे.

भारतात एक महिन्याहून अधिक काळापासून लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. यात अनेकांचे रोजगार बुडाले असून काही जण विविध शहरांमध्ये अडकलेले आहेत. अशा परिस्थितीत अनेक घरांमध्ये रेशनिंगही उपलब्ध नाही. या लोकांच्या व्यथा लक्षात घेऊन अनेक कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

आता ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही 10 लाखांहून अधिक लोकांना रेशन, जेवण आणि स्वच्छतेच्या वस्तूंचा पुरवठा केलेला आहे. याबाबत शबाना यांनी ट्‌वीटद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान, शाहरुख खान, अक्षय कुमार, आमिर खान, सलमान खान, सोनू सूद, प्रियांका चोप्रा, करीना कपूर, कार्तिक आर्यन, विद्या बालनसहित अनेक कलाकारांनी गरजू आणि गरीब कुटुंबांना मदतीचा हात दिलेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.