नेवासा, (प्रतिनिधी) – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.६) दुपारी २ वाजता नेवासारोड- नेवासा फाटा रस्त्यावरील पावन गणपती समोर असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
या मेळाव्यास महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नेवासा तालुका शिवसेना व भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचा झंझावात जोरदारपणे करण्याची व्यूहरचना या मेळाव्यातून आखण्यात येणार असून, लोखंडे यांना पुन्हा संसदेत पाठविण्यासाठी या मेळाव्यातून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.
या कार्यकर्ता मेळाव्यास महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेवासा तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.