श्रीरामपूर,(प्रतिनिधी)- अभिनव योजना व नाविन्यपूर्ण कल्पना राबवणार्या येथील श्री सिध्दीविनायक पतसंस्थेस यावर्षी 71 लाख 11 हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.
यावर्षी संमिश्र व्यवसाय 78 कोटी 72 लाख रुपयांचा झालाअसून, 47 कोटी ठेवींचा टप्पा पार केल्याची माहिती त्यांनी दिली. संस्थेचे कर्ज वितरण 31 कोटी 35 लाखांचे असून, विविध सक्षम अशा 15 बॅंकांमध्ये 18 कोटी 49 लाखांची गुंतवणूक असून ही गुंतवणूक सहकार खात्याच्या 26% गुंतवणूक असावी, या निकषापेक्षा जास्त 13% असून, एकूण गुंतवणुक 39% असल्याची माहिती संस्थेचे व्हा.चेअरमन सुनील बोलके यांनी दिली.
जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेचे श्रीरामपूर शहरात दोन शाखा व मुख्य कार्यालय स्वतंत्र असून, प्रती कर्मचारी व्यवसाय 5 कोटींचा आहे. श्री सिध्दीविनायक पतसंस्था नेहमीच व्यवसायिक दृष्टीकोन ठेवू काम करत असल्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विश्वास संस्थेने मिळवला असल्याचे प्रतिपादन बोलके यांनी केले.
भविष्यात महिला व तरुणांसाठी स्टार्टअपच्या माध्यमातन सर्व प्रकारचे मार्गदर्शन व अल्प दरात अर्थपुरवठा केला जाईल, अशी माहिती संस्थेचे CEO अमोल जोशी यांनी दिली.