वाई – बोपेगाव-पांडे गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील चंद्रभागा ओढ्यावरील पुल पुरामध्ये वाहून गेल्याने आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यासमवेत पुलाची पाहणी करून तातडीने पुलासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर केला.
गेल्या पंधरा दिवसापासून संततधार सुरू असलेल्या पावसाने नदी, नाले, ओढ्यांना प्रचंड पूर आले आहेत. यातच बोपेगाव – पांडे (ता. वाई) गावच्या रस्त्यावरील पुल पुरात वाहून गेला. सदर माहिती मिळताच आ. मकरंद पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच उपअभियंता श्रीपाद जाधव, शाखा अभियंता संजय शिंदे यांना तातडीने पुलाचे काम हाती घेण्याच्या सुचना केल्या. तसेच मंदिराच्या भिंतीची पाहणी करून यासाठी 5 लाख रुपये निधीची तरतूद केली. यावेळी किरण जाधव व पांडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.