“शाळेत असताना तू मला खूप मारायचा”, असं म्हणत वर्गमित्राने तब्बल 16 वर्षांनी घेतला बदला

रस्त्यात गाठून आणि घरात घुसून बेदम मारहाण

पुणे(प्रतिनिधी) – शाळेत एकाच वर्गात शिकत असताना साततत्याने मारहाण करणाऱ्या मित्राचा एकाने तब्बल 16 वर्षाने वचपा काढला. संबंधीत मित्राला रस्त्यात गाठत बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर घरात घुसूनही मारण्यात आले.

ही घटना औंध परिसरातील एम्स हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अमोल अंकुश कांबळे (33,रा.पुणे) यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली आहे.

24 ऑक्‍टोबर रोजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास अमोल कांबळे हे घरी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या विकी शिरतरने त्यांना थांबवून, मला ओळखले का अशी विचारणा केली.

त्यावेळी अमोल याने तु आणि मी सोबत एका वर्गात शिक्षण घेत होतो असे म्हणाल्यानंतर, विकीने त्यास तु मला शाळेत असताना खुप मारत होता. आता सापडला तुला सोडणार नाही असे म्हणत शिवीगाळ करुन लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर कांबळे घरात गेले असता विकी व त्याच्या मित्राने घरात शिरुन त्यांना लाकडी बॅटने डोळयास, पाठीवर व हातावर मारहाण करुन जखमी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.