पुणे – भरधाव स्कोडा चालकाने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, तीन ते चार जण जखमी झाले. ही घटना “झेड ब्रिज’ अर्थात काकासाहेब गाडगीळ पुलाजवळ टिळक चौकाकडे जाताना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. यातील मृताचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, धडक दिलेल्या वाहनांमध्ये एका रिक्षा होती. त्यामुळे यातील काही प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातास जबाबदार स्कोडा चालकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. तर, जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.