कोल्हापूर – महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आणि त्यांच्या पथकाने शहरातील विना मास्क, विना हातमोजे, सार्वजिन ठिकाणी थूंकणे व सोशल डिस्टंन्स न पाळणे अशा 250 भाजी, दुकानदार, मेडिकल विक्रेते व मास्क न घातलेले नागरिक यांच्याकडून महापालिकेने आज कारवाई करून 71000/- रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
यामध्ये लक्ष्मीपूरी, पापाची तिकटी, बुधवार पेठ, दसरा चौक, ताराबाई रोड, अर्ध शिवाजी पुतळा, शिवाजी पुतळा परिसर, पद्माराजे, तपोवन, शिवाजी स्टेडिअम, शाहूमिल, मार्केट यार्ड, कसबा बावडा व राजारामपूरी या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. शहरातील भाजी, दुकानदार, मेडिकल विक्रेत्यांनी हॅण्डग्लोज व मास्क न घातलेस सदरची कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विक्रेतांना वारंवार मास्क व हॅन्डग्लोज वापरण्याबाबत आवाहन केले आहे. विक्रेत्यांना सामाजीक अंतर ठेवण्यास सांगीतले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यता प्रशासनास कडक कारवाई करावी लागेल, असे आवाहन केले आहे.