भोर -करोनाच्या काळात शासनाने सुरू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत भोरचे उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव व भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या आदेशानुसार भोर पोलिसांनी 525 जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांनी नियमांचे पालन केले. मात्र, काही बेफिकीर तरुण व नागरिकांनी याला गालबोट लावले. मार्च महिन्यात 33, मेमध्ये 193, जूनमध्ये 257, आणि 19 जुलैअखेर 42 जणांवर शहरात विनामास्क येणारे, फिरणारे, दुचाकीवरून ट्रीपल सीट प्रवास करणारे, चारचाकी मोटार चालवताना सीट बेल्ट न लावणारे आदी लोकांवर कलम 188 व 184 नुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.