मुंबई – भारतीय सैन्यदलाच्या इंजिनिअरिंग फोर्समध्ये विशाल निंबा पाटील याची निवड झाली आहे. या परीक्षेसाठी भारतात फक्त सातच जागा असून यामध्ये विशाल पाटील हे देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावातील विशाल निंबा पाटील शेतकरी कुटुंबातील आहे. घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना देखील एका शेतकऱ्याच्या मुलाने कठोर परिश्रम घेत आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
साम वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांचादरनिर्वाह शेतकरीवर चालतो. आसाणे गाव दुष्काळग्रस्त असल्यामुळे शेतीच्या पिकालाही चांगला भाव येत नाही. बेताची परिस्थिती असतानाही कशी जिद्दीच्या जोरावर विशाल पाटील यांनी कठोर परिश्रम घेत भारतीय सैन्यदलाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. संपूर्ण भारतातून घेण्यात आलेल्या या इंजिनिअरिंग परीक्षेत केवळ सातच जागा होत्या. विशाल पाटील यांचा तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशाल पाटील यांच्या यशाचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे.