नंदूरबार – नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर जामनेरहून सुरतकडे जाणारी जामनेर सुरत बस आणि सुरतकडून महाराष्ट्र राज्यात येणारा ट्रक यांच्यात नवापूर येथील सीमा तपासणी नाक्याजवळ समोरासमोर धडक झाली. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात जवळपास 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातात जखमी प्रवाशांवर नवापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यात अपघात वाढले असल्याचे बोलले जात आहे. जामनेर सुरत बस मधील प्रवाश्यांना पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे.