मुंबई – बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर आज पडद्यावर क्वचितच दिसते. मात्र सोनमने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘सावरिया’ या चित्रपटातून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली.
यामध्ये ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. ‘वीरे दी वेडिंग’ हा सोनमचा एक प्रसिद्ध चित्रपट आहे, ज्यामध्ये सोनमची बोल्ड शैली पाहायला मिळाली. अशात, सोनमने तिच्या एका मुलाखतीत सासरच्या लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल खुलासा केला होता. जाणून घेऊया काय म्हणाले सोनम…?
सोनम कपूर ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते, मग ती खऱ्या आयुष्यात असो किंवा पडद्यावर. सोनमचा एक प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ‘वीरे दी वेडिंग या चित्रपटात सोनम पार्टीमध्ये दारू पिऊन शिवीगाळ करताना दिसली. एवढेच नाही तर अभिनेत्रीचे बोल्ड सीनही पाहायला मिळाले. यावरही बराच गदारोळ झाला. अशात सोनमच्या सासरच्या लोकांची यावर अप्रतिम प्रतिक्रिया पाहायला मिळाली, ज्याचा खुलासा तिने स्वतः एका मुलाखतीत केला आहे.
सासरच्या ‘रिएक्शन’बद्दल बोलताना सोनम कपूर म्हणाली होती की, ‘तिच्या कुटुंबातील सदस्यांना आणि सासरच्या मंडळींना काहीच अडचण नव्हती. सोनम बोल्ड सिन ला तिच्या कामाचा एक भाग मानते आणि ते करायला ती अजिबात मागेपुढे पाहत नाही. सोनमला सासरच्या मंडळींकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पती आनंद आहुजाच्या कुटुंबीयांनी तिच्या या कामाचे खूप कौतुक केले आहे.