जळगाव – धावत्या बसवर झाड कोसळल्याची घटना यावल भुसावळ रस्त्यावर सोमवारी दुपारी घडली. या घटनेत चालकासह 12 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावल आगाराची बस (क्र. एमएच 20, बीएल 2542) आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जात होती. या दरम्यान पाटचारीजवळ असलेले मोठे झाड बसवर कोसळले. या घटनेत 12 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाताच यावल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील जखमींची नावे –
सुरेश पंढरीनाथ महाजन, इच्छाराम टिकाराम राजपूत, पंडित लक्ष्मण परणकर (वय 66, रा. यावल), शकुंतला विलास चौधरी (वय 60, रा. धानोरा), पद्माबाई रमेश कोळी (वय 50), मंगला रामदास चौधरी (वय 55), सुशिलाबाई किसन धनगर (वय 60, रा. मुक्ताईनगर), जोवरा रशीद खाटीक (वय 50, रा. अडावद), सुरेश पंढरीनाथ महाजन (वय 52), कल्पना संतोष चौधरी (वय 55), दीपक येवलू वानखेडे (वय 24) आणि नीलम शैलेंद्र पाटील (वय 17) असे 12 जण जखमी झाले आहेत.