इंदोर – मध्य प्रदेशच्या इंदोर शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात असणाऱ्या एका इमारतीला शनिवारी पहाटे आग लागण्याची घटना घडली होती. यात 7 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 9 जण भाजले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा कयास अगोदर वर्तवण्यात आला होता. मात्र आता सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले असून आग लागली नव्हती, तर लावली गेली होती हे त्यातून स्पष्ट झाले आहे.
एका माथेफिरू तरूणाने एकतर्फी प्रेमातून ही आग लावली त्यात 7 जणांना जीव गमवावा लागला. त्या युवकाचे संबंधित मुलीशी भांडण झाले होते. त्यानंतर त्याने त्या इमारतीच्या पार्किंगमधील त्या मुलीच्या दुचाकीला आग लावली. त्या आगीने भीषण रूप घेतले व हा धक्कादायक प्रकार घडला.
शॉर्ट सर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज अगोदर वर्तवण्यात आला होता. मात्र सीसीटीव्हीत आरोपी हे कृत्य करताना सापडला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातलगांना प्रत्येकी चार लाख रूपये मदतीची अगोदरच घोषणा केली आहे.