हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बनबरडा शिवारात एका पुलाखाली असलेल्या पाण्यात अनोळखी तरुणाचा मृत्यूदेह रविवारी दि 7/08/2022रोजी सकाळी दहा वाजता आढळून आला. विशेष म्हणजे मुर्तदेहाच्य बाजूला दुचाकी आसून सदर दुचाकी अकोला पासिंगची आहे. घटनास्थळी सेनगाव पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले आहे.
सेनगाव तालुक्यातील बनबरडा शिवारातील सरस्वती नाला आहे. या नाल्यांच्या पुलावरून शेतकरी शेतात ये जा करतात. आज सकाळी दहा वाजन्याच्या सुमारास पुलाच्या पाण्यात दुचाकी आढळून आली. त्या नंतर काही शेतकऱ्यांनी पाहणी केली असता बाजूला पाण्यातच एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरनाची माहिती मिळाल्यानंतर गावकरी घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, सतिष ठेंगे, जमादार अनिल भरती, सुदर्शन खांडेकर, जीवन मस्के यांच्या पथकाने तातडीने घटनस्थळी भेट दिली. दरम्यान सदर मृतदेहाजवळ आसलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून सदर दुचाकी अकोला पासिंगची असून त्याचा क्रमांक (एम एच-30-एम-1272) असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे पुलाच्या वर रस्त्यावर रक्त सांडलेले आसल्या मुळे त्या तरुणांचा खून झाल्याची शकयता व्यक्त केली जात असून पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटविण्यास सुरुवात केली.