६०० जोड्या धावल्या तर फन रन साठी १२० रनर्स चा सहभाग
पांचगणी : देशातील पहिली जावली जोडी रन स्पर्धा रविवारी मैत्री दिनाच्या औचित्यावर मेढा येथे हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अनोख्या मॅरेथॉनमध्ये हजारो रनर्स, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. रनर्स स्पोर्ट असोसिएशन जावली कडून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
जावली जोडी रन ही देशातील पहिलीच जोडी मॅरेथॉन असून गेल्या तीन वर्षांपासून ही मॅरेथॉन मेढा येथे संपन्न होत आहे.
मॅरेथॉनचे या तिसऱ्या वर्षी मॅरेथॉन मध्ये हजारो रनर्स नी आपला सहभाग नोंदविला होता. भारतात अशा पद्धतीची ही पहिलीच मॅरेथॉन असल्यामुळे या स्पर्धेत राज्यातील तसेच राज्याबाहेरील स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला होता. याशिवाय मॅरेथॉनमध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांनीही आपला सहभाग नोंदविला होता. ही मॅरेथॉन मेढा – पिंपरी- गांजे ते पुन्हा गांजे-पिंपरी- मेढा या निसर्गरम्य मार्गावर संपन्न झाली. यावेळी मॅरेथॉनमध्ये पुरुष पुरुष जोडी गटात ऋषभ शिंदे – प्रथमेश यादव, अजित निकम -नितीन थोरात,महादेव लेंभे – अजय भैताडे विजयी झाले आहेत. स्त्री- स्त्री गटात काजल धनावडे- संजना जाधव, दिपाली खरात- माधुरी शिवदे, दिपाली महाजनी -आराधना केंजळे या महिला विजयी झाल्या आहेत. तर महिला पुरुष गटात शुभांगी खांडेकर – वसंत लकडे,अलमास मुलाणी-किरण गेजगे,संगीता उबाळे-उद्धव इंगवले या जोड्या विजयी झाल्या आहेत.
जोडी रन मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी माऊली डेव्हलपर्स, यशवंत हॉस्पिटल, मीनाक्षी हॉस्पिटल, शहा डॉक्टर, अजिंक्य उद्योग पाचगणी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रनर्स स्पोर्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ डिगे, पंकज नागोरी,संजय धनावडे, सुहास पाटील, विलास डिगे,संतोष कदम, प्रियांक शेलार,संतोष बनकर व असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी कष्ट घेतले.
मान्यवरांची उपस्थिती..
जोडी मॅरेथॉनसाठी नरेंद्र पाटील, वसंतराव मानकुमरे, सदाभाऊ सपकाळ, ज्ञानदेव रांजणे, तहसीलदार राजेंद्र पोळ, नायब तहसीलदार संजय बैलकर, सपोनि अमोल माने यांची उपस्थिती..