मुंबई – बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोणचा समावेश होतो. दीपिकाने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर तिला बॉलिवूड चित्रपट ‘ओम शांती ओम’ने प्रसिद्ध केले. दीपिकाने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. दीपिका केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्याचबरोबर दीपिकाला एक लहान बहीण देखील आहे. ती देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
दीपिकाची बहीण अनिशा पदुकोण एक व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. ती स्पोर्ट्स गर्ल आहे त्यामुळे ती एकदम फिट आहे. तिचे अनेक नवीन जुने फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. खालील फोटोतील तिची शैली पाहण्यासारखी आहे. फोटोसाठी अनेकदा ती खूप सुंदर पोज देताना दिसते. दीपिका प्रमाणेच अनिशाला देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे.
दीपिकाची बहीण अनिशाचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. कमेंट करताना एका चाहत्याने म्हटलं की काय प्रकरण आहे, तर दुसऱ्याने कमेंट करत तुम्ही दोघंही खूप फिट आणि स्टायलिश आहात असल्याचे म्हंटले आहे. अनेकांनी तर अनिशाला दीपिकाची जुळी बहीण आहेस का असे देखील विचारले आहे. बऱ्याच फोटोंमध्ये अनिशा दीपिका सारखी पोज देताना दिसल्यामुळे त्या दोघीही हुबेहूब दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.