नवी दिल्ली- एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी त्यागाची आणि सातत्याची गरज असते. मात्र हे सगळं असलं तरी सगळ्यात महत्वाचं असतं ते आपल्या हक्काच्या माणसाचं सहकार्य आणि त्यांचा विश्वास. हे सगळं असलं तर कोणतीच गोष्ट आपल्या पासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.
झारखंड मधील एका दाम्पत्याने परिक्षेसाठी तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास स्कुटरवर केला. विशेष म्हणजे पत्नी ही गर्भवती होती. पत्नीची डीईईची (डिप्लोमा इन एलिमेंटरी एक्झाम) परीक्षा होती. त्यासाठी वाहनं उपलब्ध नसल्याने त्यांनी स्कुटरवर 1200 किलोमीटरचा पल्ला स्कुटरवरुन गाठला. परिक्षा देण्यासाठी हे दोघे ११ सप्टेंबर रोजी ग्वाल्हेरला पोहोचले. पण धनंजय हे त्यांच्या गर्भवती पत्नीला सोनाला घेऊन स्कुटर चालवत ग्वाल्हेरला पोहोचले.
Madhya Pradesh: A couple, who reached Gwalior from Godda in Jharkhand on a scooter to appear in an exam, has been given return air tickets by a corporate group. Dhananjay, the man says, “We never boarded a plane in our lives. We thank them for the support.” (06.09.2020) pic.twitter.com/Er8pAUhcnl
— ANI (@ANI) September 6, 2020
हे पाहून अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती अदानी यांनी मदत केली. ”धनंजय आणि सोनी यांची मॅरेथॉन यात्रा खूपच आशावादी होती. आम्ही गोड्डामध्ये त्यांच्या परतीच्या आरामदायी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी आम्ही विनम्र आहोत आणि स्थानिक मीडियाने त्यांची कथा प्रसिद्धीत आणली, त्यांचेही आभार.”, असं त्या म्हणाल्या.