पुणे -“तू माझ्या टेम्पोतील भाजी का चोरतो,’ असा आरोप करत दुचाकीस्वाराच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी एका सराईताला कोथरूड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
किरण ज्ञानेश्वर बोत्रे (वय 22, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी सचिन खाटीकमारे (वय 26, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 12 मार्च रोजी सकाळी घडली.