नवी दिल्ली – जागतिक बाजारात चांदीचे दर कमी झाल्यामुळे भारतीय बाजारात सोमवारी चांदीच्या दरात घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोमवारी चांदीचा दर 505 रुपयांनी कमी होऊन 61,469 रुपये प्रति किलो झाला. त्याचबरोबर सोन्याच्या दरात 42 रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 45,960 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1774 डॉलर तर चांदीचा दर कमी होऊन 23.50 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. सध्या सोन्याचचे दर तुलनेने कमी असल्यामुळे भारतामध्ये काही ग्राहक सोन्याची खरेदी लग्नासाठी आणि दागिन्यासाठी करीत असल्याचे वातावरण आहे असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.