नवी दिल्ली : आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रीच्या सणाच्या अगोदरच सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४५,९५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती.
गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, चांदी ५७,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५६,७०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,९५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,१३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१३० रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,१३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७२ रुपये आहे.