Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घट

मुंबई – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात आज सोन्याच्या दरात 244 रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 46,747 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

त्याचबरोबर तयार चांदीचा दर 654 रुपयांनी कमी होऊ 63,489 रुपये प्रति किलो झाला. दिवाळीमध्ये सोन्याचे दर कमी होत असल्यामुळे सोने खरेदी करण्याची भारतीय ग्राहकांना संधी असल्याचे समजले जाते.

जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. भारतामध्ये सोन्याचे उत्पादन होत नसल्यामुळे जागतिक बाजारातील दरानुसार भारतात सोन्याचे दर ठरतात.

या संबंधात बोलताना एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, आगामी काळात डॉलर आणखी कमकुवत झाला तर सोन्याचे दर कमी होऊ शकतात. जागतिक बाजारातही सोन्याचे दर कमी होऊन 1,787 डॉलर व चांदीचे दर 23.94 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.