मांडवगण फराटा(प्रतिनिधी) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंपळसुट्टी या गावातील २९ वर्षीय नवविवाहीत वकील व्यक्तीचा करोना अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहीती मांडवगण फराटा केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॅ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली.
सदर तरुण हा ११ जुलै रोजी दौंड नगरपालिकेत कामानिमित्त गेला होता.त्यानंतर त्याला सर्दी, खोकला याचा ञास होऊ लागला होता. सदर तरुण १५ जुलै रोजी एका खाजगी डाॅक्टरकडे उपचारासाठी गेला होता.परंतु त्याला पुन्हा ञास होत असल्याने तो पुन्हा १८ जुलै रोजी तो वरवंड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला.त्याच दिवशी करोना तपासणीसाठी सदर तरुणासह त्याच्या पत्नीचे घशाचे स्बॅव यवत येथे कोवीड सेंटर येथे पाठवण्यात आले होते.
त्यापैकी त्याच्या पत्नीचा करोना अहवाल निगेटिव्ह आला असून तरुणाचा अहवाल माञ पाॅझिटिव्ह आला आहे.सदर तरुणाच्या एकूण १० जण हे संपर्कात आले असून सर्वांना होम क्वारटाईन करण्यात आले आहे.तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्बॅव तपासणीसाठी शिरूर येथे सोमवारी पाठवण्यात येणार असल्याचे डाॅ. सातपुते यांनी सांगितले.