जळोची : बारामतीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून बारामतीत ‘बारामती पॅटर्न’ राबविण्यात आला. व पुढील काही दिवसातच बारामती कोरोना मुक्त झाली. त्यानंतर नियम शिथिल होताच पुन्हा शहर गजबजू लागल्याने पुन्हा शहरात कोरोनाने शिरकाव केला.
शहरात आतापर्यंत ७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पैकी ५ जणांंचा मृत्यू झाला असून ३२ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३४ रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. आज ६८ जणांंची तपासणी केली असून त्यांचे कोरोना अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.