नवी दिल्ली – राजस्थानातील आदिती माहेश्वर या 20 वर्षीय मुलीला एक दिवसासाठी भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त बनण्याची संधी मिळाली. दिल्लीतील मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये बी.एस.सी.फिजीक्सचे शिक्षण घेणाऱ्या आदितीने ऑक्टोबरमध्ये “ब्रिटीश हायकमिशन फॉर द डे’ या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
ही स्पर्धा 2017 पासून सातत्याने आयोजित केली जात आली आहे. 11 ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाईल्ड साजरा केला जातो. त्यानुमित्ताने एका बालिकेला एक दिवसासाठी ब्रिटीश उच्चायुक्त बनवण्यात येत असते. त्याअंतर्गत यावर्षी आदितीला हा बहुमान मिळाला आहे. या स्पर्धेतून हा बहुमान मिळवणारी ती भारतातील पाचवी विद्यार्थिनी ठरली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची तिची महत्वाकांक्षा यामुळे अधिकच भक्कम झाली आहे.
शुक्रवाही एक दिवसाची ब्रिटीश उच्चायुक्त झालेल्या आदितीने डिप्लोमॅटिक व्यवहारांमध्ये भाग घेतला. भारत-ब्रिटन एनर्जी फॉर ग्रोथ डायलॉगमध्येही ती सहभागी झाली. नेतृत्व करणाऱ्या महिलांसाठी राबवल्या जात असलेल्या चेव्हेनिंग ऍल्युमनी फंडसाठीच्या कार्यक्रमामध्येही ती सहभागी झाली होती.