हरान – इराणमधील परिवहन आणि शहरीकरण मंत्रालयासह इतर सर्व मंत्रालयांच्या वेबसाइट आज दिवसभरासाठी बंद होत्या. या सर्व वेबसाइटच्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये बिघाड झाल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली होती, असे “आयआरएनए’ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हा प्रकार सायबर हल्ला होता की नाही, हे निश्चितपणे स्पष्ट केले गेलेले नाही. मात्र, या प्रकारामागील नेमका कारण शोधले जात असल्याचे या वृत्तसंस्थेच्या बातमीमध्ये म्हटले आहे.
इराणच्या रेल्वेच्या वेबसाइटमध्येही बिघाड झाला होता.
तो निश्चितपणे सायबर हल्ला होता. हॅकरनी रेल्वेला वेळापत्रकापेक्षा उशीर होत आहे किंवा रेल्वे रद्द झाल्या असल्याबाबतचा खोटा मेसेज देशभरातील रेल्वे स्टेशनवरच्या डिस्प्ले बोर्डावर पोस्ट केला होता. इराणमधील इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग सिस्टीम देखील बंद पडली होती. 2018 मध्येही इराणमध्ये अशाच प्रकारे सायबर हल्ला झाला होता. त्याचीच ही पुनरावृत्ती असावी असे इराणचे दूरसंचार मंत्री मोहम्मद जावद अझरी जाहरोमी यांनी म्हटले आहे.
आतार्पंत कोणत्याही गटाने या सायबर हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. इराणच्या कॉम्प्युटर व इंटरनेट प्रणालीमध्ये या हल्ल्यामुळे काही नुकसान झाले आहे का, हे स्पष्ट झाले नाही.