धक्कादायक ! 17 वर्षीय मुलाची 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

मुंबई – 17 वर्षीय मुलाने 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोहम मराठे असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने डोंबिवली पश्चिमेकडील यश इन्क्लेव्ह या इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी दुपाली 12.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहमने गुरूवारी दुपारी 12.30 वाजता इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूक्मिणीबाई रूग्णालयात पाठवला होता. सोहम काॅलेजमध्ये शिकत होता. डोंबिवली पश्चिमेकडील कुभारखान पाडा येथील खंडोबा मंदिराजवळ असलेल्या यश इन्क्लेव्ह इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, बुधवारी देखील डोंबिवलीमधील एकाने आजारपणाला कंटाळून कसाराजवळील उंबरमाळी रेल्वेस्थानकाजवळ अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली होती. मूलचंद देवजी गौसर (वय-52, विष्णूनगर, डोंबिवली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.