लाऊडस्पीकरचा माईक बंद न करताच झोपले मौलवी; रात्री येत होता भलताच आवाज

मुंबई – सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचा नेम नसतो. त्यामुळे अनेकदा एखाद्या कृतीने तो व्यक्ती सर्वांना परिचीत होतो. नुकताच एका लग्नातील मोराचा डान्स व्हायरल झाला होता. असाच काहीसा किस्सा समोर आला आहे. सोशल मीडियावर एका मशिदीतील मौलवींनी मशिदीच्या भोंग्याचा माईकच सुरू ठेवला. या माईकमधून येणार आवाज परिसरात चर्चेचा विषय ठरला.

मौलवीचा व्हिडिओ सथ्या वेगाने व्हायरल होत आहे. अजान पठण केल्यानंतर मौलवी माईक बंद करायला विसरले आणि त्यानंतर जे लोकांना ऐकायला मिळाले त्यावरून सोशल मिडीयावर धुमाकूळ सुरू आहे. या व्हिडिओमध्ये माइक चालू असून मौलवी रात्री घोरताना सर्वाना ऐकायला येत आहे.

काही यूजर्सने या व्हिडीओ वरून मौलवींना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तर काहींच्या मते मौलवीसाहेबांसारख्या भाग्यवान माणसालाच अशी झोप लागू शकते. दरम्यान,ही घटना कुठे घडली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 51 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.