भोपाळमधील अनेक रिक्षा चालकांचे नीच कृत्य
भोपाळ : जुने शहर भागात एका 13 वर्षीय मुलीवर अंमली पदार्थ देत अनेक रिक्षाचालकांनी बलात्कार केला. हा प्रकार जवळपास सहा महिने सुरू होता.
आपल्या आजी सोबत ही मुलग निशातपुरा भागात रहात होती. आजीशी वाद झाकल्याने तीने घर सोडले. ती हनुमानगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बस स्थानकावर गेली. तेथे अभय नावाच्या रिक्षाचालकाशी त्याच्याशी मैत्री झाली. त्याने तिला गांजा ओढायला देऊन तिला निर्जन स्थळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला नेहमी गांजा देऊन बलात्कार करू लागला.
त्यानंतर या मुलीची ओळख त्याने अन्य काही रिक्षाचालकांशी करुन दिली. तेह नियमितपणे गांजा आणि अन्य अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार करू लागले. ती अंमली पदार्थाच्या व्यसनांच्या आधीन झाली. अंमली पदार्थ मिळाले नाही तर ती हिंसक होऊ लागली. त्यामुळे तिच्या वर्तनातलि फरक पाहून चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधला.
चाईल्ड हेल्पलाईनने तिचे समुपदेशन केले. त्यावेळी तिने तिच्यावरील आपबिती कथन केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला. यातील अभयची ओळख पटली असून अन्य काही आरोपींची नावे निष्पन्न झाली आहे. मात्र त्यांना अद्याप अटक केली नाही.
या आरोपींकडून आणखी एका 16 वर्षीय मुलीलाही दारू आणिअंमली पदार्थ देत तिच्यावरही असाच बालात्कार करत असल्याचे या मुलीने चाईल्ड लाईनला सांगितले. या मुलीचा शोध घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.