पुणे- शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची (मायक्रो कन्टेन्मेंट झोन) संख्या 33 वरून 13 पर्यंत खाली आली आहे. दि. 4 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत ही नवी प्रतिबंधित क्षेत्रे अस्तित्त्वात असतील. दरम्यान, शहरातील करोना स्थिती सुधारल्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती देण्यात आली.
याबाबतचा आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी काढला. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये यापूर्वी नमूद केलेल्या अटींचे पालन करणे अनिवार्य राहील, असे स्पष्ट करण्यात आले.
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची नावे पुढीलप्रमाणे-
गाडगीळ पुतळा चौक ते जन्म मृत्यू कार्यालय कसबा पेठ, फडके हौद ते लाल महाल चौक, लाल महाल चौक ते समाधान चौक, गुरूवार पेठेतील पानघंटी चौक ते अग्निशामक केंद्र, आंबेगाव बुद्रुक येथील चंद्रांगण सोसायटी, सिल्वर पार्क सोसायटी परिसर, कात्रज, संतोषनगर, संपूर्ण संतोषीमाता परिसर, आंबेगाव बुद्रुक येथील सर्व्हे क्र. 16, वानवडी येथील नानावटीनगर, लोहगाव येथील संतनगर, आदर्शनगर, पोरवाल रस्ता, निंबाळकर कॉलनी, पार्क स्प्रिंग सोसायटी, फुरसुंगी येथील भेकराईनगर, ढमाळवाडी परिसर, हडपसर येथील ससाणेनगर परिसर, कोथरूड येथील पीएमसी कॉलनी, कृष्णा नगर, शास्त्रीनगर, न्यू लोकमान्य वसाहत, पौड रस्त्यावरील डाव्या बाजूचा परिसर, सुतारदरा.