अंकारा – तुर्कस्तानच्या पश्चिम भागात झालेल्या भूकंपात तब्बल 34 तासांनंतर एक 70 वर्षीय वृध्दाला ढिगाऱ्याखालून जीवंत बाहेर काढले. या भूकंपात 46 जण मरण पावले तर 900 जण जखमी झाले.
अहमेत सिटीम या व्यक्तीला घराच्या ढिगाऱ्याखालून इझमीर या शहरात बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर या व्यक्तीने मी माझी आशा क्षणभरही सोडली नव्हती, असे सांगितल्याचे ट्विट तुर्कस्तानचे आरोग्यमंत्री फाहरेत्तीन कोका यांनी केले आहे.
तुर्कस्तानमधील सर्वाधिक फटका बसलेल्या इझमीर शहराते रविवारी नऊ इमारतीत शोधकार्य सुरू होते. त्यात पाच हजार 700 सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. अन्न वाटप, मानसिक उपचार आणि इमारतींच्या डागडुजीसाठी अन्य शेकडो हात पुढे येत आहेत.
या ढिगाऱ्याखाली आणखी जीवित व्यक्ती असल्यास त्यांना 72 तासांत बाहेर काढाव्या लागतील. त्यांच्या जीवितासाठी मी इश्वराकडे प्रार्थना करतो, असे उपराष्ट्राध्यक्ष कुअत ओकताय यांनी माध्यमांना सांगितले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलबर 6.9 नोंदवण्यात आली.