ओटावा – कॅनडातील क्युबिक शहरात एका विशीतील तरूणाने केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जण ठार झाले. तर अन्य पाच जण जखमी झाले. या प्रकरणी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
शहाराच्या रॅम्पर्ट भागात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला घडल्याचे माध्यमांनी सांगितले. या हल्ल्याबाबत लगेच कोणतेही भाष्य करणे योग्य नाही. क्युबेक हा कॅनडातील फ्रेंच भाषिकांचा प्रांत आहे अशाच स्वरूपाचे हल्ले फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यात झाले होते.
त्यावेळी क्युबेकमधील नागरिकांनी रस्त्यावर येऊन फ्रान्सला पाठिंबा दिला होता, हे लक्षात घेऊन तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पार्लमेंट हिल भागातील लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. लोकांनी आपल्या घराचे दार बंद करून घरातच थांबावे कारण या हल्ल्याचा तपास अद्याप सुरु आहे, असे ट्विट पोलिसांनी केले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली.