पुणे – शहरात शुक्रवारी दिवसभरात 284 करोना बाधितांची नोंद झाली. तर 322 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, दिवसभरात 2,970 स्वॅब टेस्ट करण्यात आल्या.
पावसाळा संपून आता थंडीची चाहूल सुरू होणार आहे. या संक्रमणकाळात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनाही निमंत्रण मिळते. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेतली तर या आजारापासून त्यांना स्वत:ला संरक्षित ठेवता येणार आहे. सध्या करोनाबाधितांची संख्याही कमी झाली असली, तरी दररोज दोनशेच्या आसपास बाधितांची नोंद केली जात आहे.
याशिवाय 21 करोनाबाधितांचा मृत्यु झाला त्यातील पाच जण पुण्याबाहेरील आहेत. यामुळे शहरात करोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या 4,211 झाली आहे.
सध्या 584 रुग्ण गंभीर असून, त्यातील 333 रुग्णांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 961 असून, बरे झालेल्यांचे प्रमाण 1 लाख 51 हजार 145 आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.